नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महिला टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. पश्चिम बंगालची फलंदाज रिचा घोष हा संघातला एकमेव नवा चेहरा आहे. हरयाणाची पंधरा वर्षाची शेफाली वर्मा हिनं संघातलं आपलं स्थान कायम राखलं आहे.
२१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियातच तिरंगी टि-ट्वेन्टी मालिकाही होणार असून त्यासाठीही सोळा सदस्यांचा संघ आज बी.सी.सी.आय नं जाहीर केला. या सोळा पैकी पंधरा जणी विश्वचषकासाठीच्या संघातल्याच असून नुझत परवीन ही सोळावी खेळाडू आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर सह स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा, हर्मिन देओल, वेदा कृष्णमूर्ती, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार, शिखा पांडे, रिचा घोष आणि अरुंधती रेड्डी या खेळाडूंचा पंधरा जणींमध्ये समावेश आहे.