Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात ‘परीक्षा पे चर्चा दो हजार बीस’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाची उत्सुकता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातले विद्यार्थी, शिक्षक तसंच पालक वर्ग ‘परीक्षा पे चर्चा दो हजार बीस’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाची मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. येत्या 20 तारखेला नवी दिल्लीच्या तालकवेरा मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.

देशभरातले सुमारे दोन हजार विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतील, तसंच परीक्षेचा ताण येऊ नये, यासाठी करायच्या उपाययोजनांविषयी निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

Exit mobile version