नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनाबद्दल भारतानं आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंतच फडकवला जाईल, तसंच कुठलेही अधिकृत मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.
दरम्यान, हैथम बिन तारीक अल सैद यांनी काल ओमानच्या नवे सुलतान म्हणून शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. नवीन सुलतानांच्या नेतृत्वाखाली ओमान आपली प्रगतीची वाटचाल आणि वैश्विक शांतीसाठीचं, योगदान कायम राखेल, असा विश्वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला.
भारताचे ओमानशी ऐतिहासिक संबंध असून, दोन्ही देशांतले परस्पर संबंध अधिक वाढवण्यासाठी भारत सय्यद हैथम यांच्या सोबत जोमाने काम करेल, असंही प्रधानमंत्री म्हणाले.