Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उत्तर भारतात अनेक ठिकाणी लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि चंदिगडसह अनेक ठिकाणी आज लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे. सुर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात सुरु होतं. पीक कापणी आणि समृद्धीशी लोहरी हा उत्सव जोडलेला आहे.

हा उत्सव लोकांमधे एकता, सामुदायिकतेची भावना मजबूत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोहरी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version