नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान-निकोबार द्वीपसमूहातली सोळा बेटं, तसंच लक्षद्वीप मधली दहा बेटं यांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास आणि सागरी खाद्यांन्न तसंच नारळावर आधारित उत्पादनांच्या निर्यातीला उपयुक्त सुविधा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
नवी दिल्लीत झालेल्या द्वीपसमूह विकास संस्थेच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल ही माहिती दिली.