नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांनी जॉर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि जपानची मियू काटो या जोडीवर 2-6, 7-6, 10-3 अशी मात केली.
उपांत्य फेरीत त्यांचा सामना अमेरिकेची वानिया किंग आणि क्रिस्टीना मेकहेल या जोडीशी होईल.