नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी दाखल केलेली क्युरेटीव्ह म्हणजेच दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली.
न्यायमूर्ती एन.व्ही.रामण्णा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या पीठानं हा निर्णय दिला. आरोपींना फाशीपासून वाचण्याचा हा अंतिम मार्ग होता. मात्र ही याचिका फेटाळल्यामुळे चारही आरोपींना या प्रकरणी फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या चौघांनाही येत्या २२ तारखेला फाशी दिली जाणार आहे.