Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता-प्रिती सुदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरुवातीलाच होण्यासाठी महिलांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं.

त्या आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होत्या. कर्करोगाचं निदान आणि उपचार, परवडणा-या दरात व्हावेत यासाठी केंद्रसरकार प्रयत्न करत आहे, असं त्या म्हणाल्या. देशभरातल्या २७ हजाराहून अधिक आरोग्यकेंद्रांमध्ये कर्करोगासह इतर संसर्गजन्य नसलेल्या निदान करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Exit mobile version