नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “इचिगो” या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात ते सहभागी होणार आहे.
दोन तटरक्षक दलांमधला हा एकोणीसावा युद्धाभ्यास आहे. या युद्धाभ्यासामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ व्हायला मदत होईल, असं तटरक्षक दलातर्फे सांगण्यात आलं आहे.