सांघिक गटात सीआयएस,सीआरपी, आयटीबीपी, सीआरपीएफ संघांना सुवर्ण
पिंपरी : महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेत पी.के.वैष्णव,समशेर सिंग, मिरा सिंग, समरेश जंग व किर्ती के सुसीलन यांनी आपापल्या गटात अव्वल कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. सांघिक गटात सीआरपी संघाने महिलांच्या 300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन, पुरूषांच्या 50 मीटर फ्री रायफल प्रोन व महिलाच्या 10 मीटर एअर रायफल या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान राखत तिहेरी सुवर्णपदक पटकावले.
वडाचीवाडी फयरींग रेंज, उंद्री येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरूषांच्या 300 मीटर बीग बोर रायफल प्रकारात सीआयएसच्या पी.के.वैष्णवने सर्वाधीक 587.0 गुण मिळवत सुवर्ण पदक पटकावले. राजस्थानच्या विरेंद्र चौधरीने 585.0 गुणासह रौप्य तर आय ती बी च्या विरेंद्र प्रकाश याने 581 गुणांसह कांस्य पदक पटकावले.
पुरूषांच्या सांघिक गटात 300 मीटर बीग बोर रायफल प्रकारात सीआयएसएफ संघाने 1729.0 गुणासह सुवर्ण पदक पटकावले. यात पी.के.वैष्णवने वैयक्तीक गटाप्रमाणे सांघीक गटातही 587.0 गुण मिळवत संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. सुधिर कुमारने 576.0 तर भिमसिंग रावतने 566.0 गुण मिळवले. राजस्थान संघाने1716.0 गुणांसह रौप्य व सीआरपीएफ संघाने 1710.0 गुणांसह कांस्य पदक पटकावले.
महिलांच्या 300 मीटर बीग बोर रायफल प्रकारात सीआरपीएफच्या मिरा सिंगने 577 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. तेलंगणाच्या व सी.एच माधवीने 575 गुणांसह रौप्यपदक तर तेलंगणाच्या किनारा शर्मा हिने 573 गुण मिळवत कास्यपदक पटकावले. महिलांच्या सांघिक गटात सीआरपी संघाने1714.0 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. यात मिरा सिंगने 577.0, कुमारी शर्माने 573.0 व मनशा मांडवी 564.0 गुण मिळवले. तेलंगणा संघाने 1705.0 गुणांसह रौप्य व बीएसएफ संघाने 1672.0 गुणासह कांस्य पदक पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या 50 मीटर फ्री रायफल प्रोन प्रकारात बीएसएफच्या समशेर सिंगने618.3 गुणांसह सुवर्ण तर सीआरपीच्या मलिक खानने 616.9 गुणांसह रौप्य व रामस्वरूपने 616.0 गुणांसह कांस्य पदक पटकालव. सांघिक गटात सीआरपी संघाने 1848.2 गुणासह सुवर्ण पदकाची कमाई केली. यात मलिक खानने 616.9, रामस्वरूपने 616.0 व साफी मोहम्मदने 615.3 गुण मिळवले. सीआयएस संघाने 1834.3 गुणांसह रौप्य व बीएसएफ संघाने 1831.8 गुणासह कांस्य पदक पटकावले.
पुरूषांच्या 25 मीटर एसटीडी पिस्टल प्रकारात सीआयएसएफच्या समरेश जंगने 562.0गुणांसह सुवर्ण पदकाची कामाई केली. आयटीबीपीच्या प्रदिप सिंग शेखावतने 557.0 गुणासह रौप्य तर मानवेंद्र चौधरीने 556.0 गुणासह कांस्य पदक पटकावले. सांघिक गटाक आयटीबीपी संघाने 1665.0 गणांसह सुवर्ण पदक पटटकावले. यात प्रदिप सिंग शेखावतने 557.0, 3. मानवेंद्र चौधरीने 556.0 व मनिष राणाने 552.0 गुण मिळवले. पंजाब संघाने 1634.0 गुणासह रैप्य व सीआरपी संघाने 1631.0 गुणासह कांस्य पदकाची कमाई केली.
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात केरळच्या किर्ती के सुसीलन हीने 626.4 गुणांसह सुवर्ण पदकाची कमाई केली. पंजाबच्या अंजूम मोदगीलने 623.6 गुणांसह रौप्य तर सीआरपीच्या पुनम देवीने 618.7 गुण मिळवत कांस्य पदक पटकावले. सांघिक गटात सीआरपी संघाने 1846.3 गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. यात पुनम देवीने 618.7, कुमारी किर्तीने 618.5 व अंजू कुमारीने 609.1 गुण मिळवले. बीएसएफ संघाने 1839.1 गुणांसह रौप्य व पंजाब संघाने 1836.5 गुण मिळवत कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
पुरूष- 300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन –
1. पी.के.वैष्णव(सीआयएस)(587.0), 2. विरेंद्र चौधरी(राजस्थान)(585.0), 3. विरेंद्र प्रकाश(आयटीबी)(581.0)
सांघिक गट-पुरूष-300 मीटर बीग बोर रायफल-
1. सीआयएसएफ-1729.0:(पी.के.वैष्णव 587.0, सुधिर कुमार 576.0, भिमसिंग रावत 566.0)
2. राजस्थान-1716.0: (विरेंद्र चौधरी 585.0, शिवराज 572.0, राकेश 559.0)
3. सीआरपीएफ- 1710.0: (साफी मोहम्मद 579.0, परवीन 569.0, शौलेश कुमार सिंग 562.0)
महिला-300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन-
1. मिरा सिंग(सीआरपीएफ)(577), 2 सी.एच माधवी(तेलंगणा)(575) 3कुमारी शर्मा(तेलंगणा)(573)
सांघिक-महिला-300 मीटर बीग बोर फ्री रायफल प्रोन-
1. सीआरपी-1714.0(मिरा सिंग 577.0, कुमारी शर्मा 573.0, मनशा मांडवी 564.0)
2. तेलंगणा- 1705.0(व्हि. सुवर्णा 575.0, सी.एच माधवी 573.0, एम.विजयाम्मा 557.0)
3.बीएसएफ-1672.0(मनप्रीत कौर 570.0, नितू उज्जवल 560.0, संदिप कौर 542.0)
पुरूष-50 मीटर फ्री रायफल प्रोन
1. समशेर सिंग(बीएसएफ)(618.3), 2. मलिक खान(सीआरपी)(616.9), 3. रामस्वरूप(सीआरपी)(616.0)
सांघिक गट- पुरूष-50 मीटर फ्री रायफल प्रोन
1. सीआरपी : 1848.2:(मलिक खान 616.9, रामस्वरूप 616.0, साफी मोहम्मद 615.3)
2. सीआयएस : 1834.3:(नवदीप सिंग राठोरे 614.6, पी.के वैष्णव 613.1, एकंबीर सिंग मंडी 606.3)
3. बीएसएफ: 1831.8(समशेर सिंग 618.3, विमलेश राठोर 607.2, प्रजापती कुमार 606.3)
पुरूष-25 मीटर एसटीडी पिस्टल
1. समरेश जंग(सीआयएसएफ)(562.0), 2. प्रदिप सिंग शेखावत (आयटीबीपी)(557.0), 3. मानवेंद्र चौधरी(आयटीबीपी)(556.0)
सांघिक-पुरूष-25 मीटर एसटीडी पिस्टल
1.आयटीबीपी: 1665.0:(प्रदिप सिंग शेखावत 557.0, 3. मानवेंद्र चौधरी 556.0, मनिष राणा 552.0)
2. पंजाब : 1634.0: (बलजीत सिंग 543.0, अक्षय जैन 540.0, अजितेश कौशल 551.0)
3. सीआरपी: 1631.0 :(अंतरीक दत्ता 551.0, सुरेश माळी 541.0, लहु गायकवाड 539.0)
महिला- 10 मीटर एअर रायफल
1. किर्ती के सुसीलन(केरळ)(626.4), 2. अंजूम मोदगील(पंजाब)(623.6), 3. पुनम देवी(सीआरपी)(618.7)
सांघिक- महिला- 10 मीटर एअर रायफल
1. सीआरपी: 1846.3(पुनम देवी 618.7, कुमारी किर्ती 618.5, अंजू कुमारी 609.1)
2. बीएसएफ: 1839.1(गाडलींग कोमल 614.1, प्रिया सुरण 613.4, रूबीना 611.6)
3. पंजाब: 1836.5(अंजूम मोदगील 623.6, रजनी 607.6, गुरमीत कौर 605.3)