नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सिनेटकडे पाठवण्याबाबत अमेरिकी प्रतिनिधीगृहात आज मतदान होणार आहे. ४३५ सदस्यांच्या या प्रतिनिधी गृहात डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत आहे.
आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तपास करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याचा आरोप या सभागृहानं गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्यावर ठेवला. अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी ट्रम्प यांच्याविरुद्धच्या महाभियोगात त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचं नेतृत्व करत आहेत.
त्यांच्या वतीनं युक्तीवाद करणा-यांची नावंही आजच्या मतदानात निश्चित होण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्ष एकतर्फी महाभियोग प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लीकन पक्षानं केला आहे.