Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोख रकमेचे जास्त व्यवहार होणाऱ्या देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले आहेत. पुढला महिनाभर या नाक्यांवरच्या फास्टटॅग लेनपैकी २५ टक्के लेनचं रुपांतर हायब्रिड लेनमध्ये करायला परवानगी देण्यात आली आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एनएचएआय अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं विनंती केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. एनएचएआयच्या सर्व मार्गांवरच्या टोल प्लाझांवर गेल्या महिन्याच्या १५ तारखेपासून सरकारनं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पथकर आकारणीची फास्टटॅग प्रणाली सुरू केली होती.

टोल प्लाझाच्या किमान ७५ टक्के लेनवर या प्रणालीचा वापर करणं अनिवार्य होतं आणि रोख रकमेचा वापर कमाल 25 टक्के लेनसाठी मर्यादित ठेवला होता.

Exit mobile version