Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एका वर्षाच्या वाटाघाटी नंतर अमेरिका-चीन मध्ये व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर सह्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्षभराच्या कडक वाटाघाटींनंतर अमेरिकेनं चीन बरोबर पहिल्या टप्प्याच्या व्यापार करारावर सह्या केल्या आहेत. जवळपास वर्षभर या संदर्भातला दोन्ही देशांमधला संवाद बंद होता.

हा क्षण भविष्यातल्या सुदृढ व्यापार संबंधांची नांदी असल्याचं मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी व्यक्त केलं. बौद्धीक संपदेचं संरक्षण आणि अंमलबजावणी, दोन्ही देशांमधल्या व्यापाराचा समतोल आणि वाद-विवादाचं प्रभावी निराकरण, या गोष्टी पहिल्या टप्प्यातल्या करारात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version