Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य सरकारकडून अनेक वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी. वेणुगोपाल रेड्डी यांची वन विभागाच्या प्रधान सचिव पदी बदली करण्यात आली आहे.

याशिवाय, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका जे. मुखर्जी यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव पदी नियुक्ति करण्यात आली आहे. तर, अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव एस.ए.तागडे यांची बदली वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली आहे.

Exit mobile version