Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार मधल्या प्रमुख मंडळाच्या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार मधल्या प्रमुख मंडळाच्या या वर्षी होणा-या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार आहे. प्रधानमंत्री स्तरावर दरवर्षी होणा-या बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेचे विहित कार्यक्रम आणि अनेक स्तरावरच्या आर्थिक तसंच व्यापारी सहकार्याबाबत चर्चा होते.

रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, किर्रीझस्तान , कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान हे संघटनेचे आठ सदस्य देश तसंच अफगाणिस्तान, इराण, मंगोलिया आणि बेलारुस ह्या चार निरिक्षक देशांना या बैठकीचं निमंत्रण पाठवलं जाईल, असं परदेश व्यवहार प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. इतर आंतरराष्ट्रीय संवाद सहकारी देश देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे.

Exit mobile version