Site icon साप्ताहिक एकच ध्येय

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घालून काँग्रेस या प्रकरणाच्या चौकशीला जाणीवपूर्वक विरोध करत असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पक्ष १९८४ मधे झालेल्य शीख विरोधी दंगलीतल्या सुत्रधारांना पाठीशी घालत असून या दंगलीच्या चौकशीला जाणूनबुजून विलंब करत आहे, असा आरोप भाजपानं केला आहे. न्यायमूर्ती धिंग्रा समितीच्या अहवालाचा संदर्भ देत, तत्कालीन काँग्रेस सरकारनं दंगलीची चौकशी करण्यात पुढाकार घेतला नाही तसंच शीख जमातीच्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यात रस दाखवला नाही, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं.

या दंगलीची योग्य प्रकारे चौकशी कधीच झाली नाही, हा धिंग्रा समितीच्या अहवालातून निघालेला मुख्य निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले. दिल्लीच्या सुलतानपूर भागात शीखविरोधी ५०० घटना घडल्या पण फक्त एकच प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला गेला आणि याच्या चौकशीसाठी फक्त एका अधिका-याची नियुक्ती झाली. यावरूनच काँग्रेस सरकारचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि गांभीर्य दिसून येतं, अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

Exit mobile version