Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते लखनऊ इथं बोलत होते.

संसदीय संस्था अधिक बळकट होण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे, असं बिर्ला म्हणाले. देश विकासाच्या दिशेनं जात असताना टीका करताना लोकप्रतिनिधीनीं भान ठेवणं गरजेचं आहे, असं मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन म्हणाले. परिषदेत झालेल्या चर्चेमुळे लोकशाही व्यवस्था बळकट होईल, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं.

Exit mobile version