मुंबई (वृत्तसंस्था) : चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावीत, वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल, असा विश्वास चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक नियंत्रण शाखेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. वाहतूकीचे नियम न पाळता पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालणार्या वाहन चालकांनी आत्मपरिक्षण करण्याची खरी गरज आहे. चांगल्या कारवाईला वाहन चालकांनी प्रतिसाद दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अभिनेते मोहन जोशी यांनीही वाहतुकी संदर्भात आपले अनुभव सांगितले. गेल्या वर्षभरात अपघातांची टक्केवारी कमी करण्यात यश आल्याचं वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं.