मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काल सातारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. बंदमुळे सातारा बाजारपेठेतले सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
बंदच्या पार्श्वभूमी शहराच्या विविध भागांमध्ये कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता. बंद दरम्यान माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी खासदार संजय राऊत आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा बाजी केली.