Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत आणि इराण या परस्परपुरक अर्थव्यवस्था असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांचं वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इराण या परस्परपुरक अर्थव्यवस्था आहेत, असं इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत भारतीय औद्योगिक संघटनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक इंधनाचीही गरज आहे, आणि इराण हा भारताला इंधन पुरवठा करू शकणारा विश्वासू भागिदार आहे, असं झरीफ यांनी नमूद केलं.

भारत आणि इराणमधले संबंध धर्मिक आणि आर्थिक मुद्यांच्या पलिकडचे असल्याचंही त्यांनी अधोरेखीत केलं. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपल्या नागरिकांचं हित या दोन्ही देशांमधल्या एकसमान तत्वानंच भारत आणि इराणला एकत्र आणलं आहे, असं देसाई यावेळी म्हणाले. देशभरात आजवर झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे ३५ टक्के गुंतवणूक देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झाली असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली.

Exit mobile version