Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची इंग्लंडच्या क्वीन्स काँसेल अर्थात राणीच्या वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. इंग्लंडच्या न्याय मंत्रालयानं ही घोषणा केली. ते इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयात राणीचं प्रतिनिधीत्व करतील.

वकीली क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणा-या अनुभवी वकीलाची या पदावर नियुक्ती केली जाते. लॉर्ड चान्सलरच्या सल्ल्यावरुन इंग्लंडच्या राणीने साळवे यांची नियुक्ती केली आहे.

Exit mobile version