नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्या खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालच्या वयोगटात भारोत्तोलनाच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संकेत महादेव यानं, तर १७ वर्षाखालच्या वयोगटात अरुणाचल प्रदेशाच्या गोलोम टिंकूनं सुवर्णपदक पटकावलं.
या स्पर्धेत ३५ सुवर्ण आणि ३७ रौप्यपदकांसह महाराष्ट्र पदकतालिकेत अग्रस्थानी असून, हरियाणा दुसर्या, तर दिल्ली तिसर्या स्थानावर आहे.