Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता – महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेतला. या आढाव्यामध्ये केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता देऊनही ही अंगणवाडी केंद्रे अद्याप सुरु करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले.

तेव्हा ही केंद्रे सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्रीमती ठाकूर यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार राज्याच्या विविध भागात या नव्या अंगणवाड्या लवकरच सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

Exit mobile version