नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी जलीस अंसारी याला उत्तरप्रदेशातल्या विशेष कृतीदलानं काल कानपूर इथं अटक केली.
अंसारी २१ दिवसांच्या पेरोलवर होता. मात्र पेरोलची मुदत संपल्यानंतर परत कारागृहात न जाता तो कानपूरला रवाना झाल्याचं उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी काल लखनौ इथं सांगितलं. यासंदर्भात मुंबई पोलीसांनी उत्तरप्रदेश पोलीसांना सावध केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अंसारीच्या विरोधात देशभरात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.