Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नवी दिल्लीत एक बैठक घेऊन सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा घेतला.
चीनमधे वुहान इथं झालेल्या एक मृत्यू आणि एकेचाळीस संसर्गांच्या बातम्यांवर सरकार लक्ष ठेवून आहे, आपण जागतिक आरोग्य संस्थेच्या संपर्कात राहुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रिती सुदान यांनी यावेळी सांगितलं.
चीन वरुन आलेल्या प्रवाशांची विविध विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे तपासणीही केली जात आहे. कोरोना हा विषाणू संसर्ग प्रामुख्याने कुत्रा, मांजर, उंट यासारखे पाळीव प्राणी तसंच कधी-कधी माणसांमधेही पसरतो.
Exit mobile version