मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गनशॉटद्वारे करण्यात आले. नवचैतन्य घडवून आणणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुंबईकरांसह देश-विदेशातील स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रोत्साहन दिले.
या मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरन रिजिजू, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सिनेकलाकार राहुल बोस, मिलिंद सोमण, उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह खेळाडू उत्साहाने सहभागी झाले होते. तरुण, ज्येष्ठ नागरिक, अपंग स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये हिरिरीने सहभाग नोंदवला.