Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर प्रदेशातली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात कालपासून प्रीपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. काश्मीर खोर्‍यात दोन जिल्ह्यातील टू-जी सेवाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली. या सेवा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या.

या प्रदेशात सर्वत्र एस.एम.एस सेवाही सुरू झाली आहे. मोबाईल सिमद्वारे इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांची ओळख पटवण्याचं काम मोबाईल सेवा कंपन्यांनी करायचं आहे. ही सेवा जम्मू विभागातल्या सर्व दहा आणि कूपवाडा आणि बांदिपूर या काश्मीर खोर्‍यातील जिल्ह्यांमधे दिली जात आहे.

५ ऑगस्ट २०१९ ला संविधानाच्या ३७० कलमाच्या दुरूस्तीद्वारे जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द होऊन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमधे विभाजन झाल्यानंतर या सेवा थांबवण्यात आल्या होत्या.

Exit mobile version