नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थे प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिका-यांसोबत काल बैठक घेतली. सुरक्षा कर्मचा-यांना अधिक सर्तक राहाण्याचं आवाहन करण्यात केलं.
भाडेकरूंची ओळख, सीमेवरील तपासणी, महत्वाची ठिकाणं, मॉल आणि बाजारांमधील सुरक्षा, गर्दीच्या ठिकाणांवरील गस्त वाढवण्याचे तसंच दहशतवादविरोधी उपोययाजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. सर्व पोलिस कर्मचा-यांना निष्पक्ष कारवाई करण्याचे, अवैध मद्य आणि शस्त्र बाळगणा-यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.