नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या ५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात होत आहे. या परिषदेला ११७ देशांचे ५३ प्रमुख नेते तसंच मंत्री उपस्थित राहाणार आहेत. ‘एकजूट आणि शाश्वत जगाचे भागीदार’ अशी या परिषदेची संकल्पना आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल या परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार असून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रीका, रशिया, सौदी अरब, स्वित्झलँड, कोरीया आणि सिंगापूरच्या मंत्र्यांची भेटही घेणार आहेत. याशिवाय विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसोबत बैठकही घेणार आहेत.
भारतीय रेल्वेतील गुंतवणूक वाढवण्यासाठी तसंच जागतिक संस्थांकडून भारतातील गुंतवणूक वाढवण्याच्या हेतूनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.