नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ३० तारखेला बांग्लादेशातील ढाका इथं होणारी महापौर निवडण पुढे ढकलली आहे. बांगलादेश निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक आता १ फेब्रुवारीला होणार आहे.
सरस्वती पूजा आणि महापौर निवडणूक एकाच दिवशी येत असल्यानं अनेक संघटनां आंदोलन करत आहेत, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल रात्री ढाक्यात बोलावण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकीत ह्या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त के.एम. नुरुल हुडा यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. सत्तारूढ अवामी लीग आणि विरोधी पक्ष नॅशनलिस्ट पार्टी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.