नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या निदर्शकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.
आंदोलनकांनी रस्ता रोखल्यामुळे, ये-जा करणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत असल्यानं प्रचंड मनस्ताप होत असल्याबद्दल ही तक्रार दाखल झाल्याचं दिल्ली पोलीसांनी सांगितलं.
यासंदर्भात एफ.आय.आर. दाखल करून, तातडीनं रस्ता मोकळा करून द्यावा, असं तक्रारदारानं म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं.