नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ ही एक हानीकारक योजना असून, देशातल्या जनतेची जात तसंच त्यांची विचारधारा याविषयीची माहिती मिळवण्याचा हेतू त्यामागे असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
या योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकारनं 24 डिसेंबरला तीन हजार 941 कोटी 35 लाख रुपये मंजूर केले. या योजनेवर आंबेडकर यांनी नागुपूरात वार्ताहरांशी बोलताना टीका केली. केंद्र सरकारचं आर्थिक प्रशासन सुस्थितीत नसून महसूलाची तफावत भरुन काढण्यासाठी सरकार नवरत्न कंपन्यांसारखी उच्च मूल्य असलेली मालमत्ता विकत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.