Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. आज इंदू मिलची पाहणी केल्यावर ते बोलत होते.

बौद्ध विचारांची आस्था असणा-यांना हे स्मारक आकर्षित करेल, असंही पवार यावेळी म्हणाले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे हे देखील यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version