Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला  जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे. प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची माहिती इस्रोनं काल दिली.

यासाठी दोन तास २९ मिनिटांचा अवधी लागला. या उपग्रहाला ११ दशांश अंशाच्या कोनात पृथ्वीपासून ३५ हजार ८२६ किलोमीटर आणि ३५ हजार ९१३ अंतरावर प्रस्थापित केलं आहे.

Exit mobile version