नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीनं मंजुरी दिली आहे. यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धविषयक प्रणालीचाही अंतर्भाव आहे. या प्रणालीची रचना, संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केली असून, तिची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे.
संरक्षण दलांना लागणारं आत्यंतिक गरजेचं साहित्य आणि उपकरणं खरेदी करण्यासाठीच्या नव्या आणि चालू प्रस्तावांवर देखील समितीनं विचार विनिमय केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत.