Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पर्यावरण संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिकचा वापर टाळावा, वृक्षतोड करु नये, पाण्याचे नैसर्गिक स्रोत जतन करावे, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा, अशी शपथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली.

पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातल्या सर्व शाळांमधे समृद्ध पर्यावरण रक्षण संकल्प शपथ अभियानाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झाली.

दररोज शाळेत विद्यार्थ्यांना ही शपथ दिली जाणं बंधनकारक केलं जाणार आहे, असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

Exit mobile version