Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी करायला सांगितलं आहे.

शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाणी पिण्याची घंटा-वॉटरबेल वाजवण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत. काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा अशी घंटा वाजवण्याची सूचना यात केली आहे.

मुलांनी दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version