नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि तीन आशियायी राष्टांमध्ये सार्स सारख्या भयंकर विषाणूमुळे जलद गतीनं आजार पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर या रोगाला नियंत्रीत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक जिनेव्हा इथं होत आहे.
या बैठकीत आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे आतापर्यंत तीन लोकांचा बळी गेला आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याचं चीननं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.