Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑस्ट्रेलियात वणवा विझवण्यासाठी पाण्याचा मारा करणारं विमान आगीचा सामना करताना कोसळलं असल्याची भीती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये आज सिडनीजवळच्या डोंगराळ भागात वणव्यावर पाण्याचा मारा करणारं एक विमान आगीचा सामना करताना कोसळलं असण्याची शक्यता आहे. स्नोई मोनारो परिसरात हवेच्या एका टँकरशी संपर्क तुटल्याची माहिती अग्निशमन यंत्रणेनं दिली आहे.

स्थानिक भागात काम करणाऱ्या तुकड्यांनी विमान कोसळल्याचा अंदाज बांधला आहे. सिडनीपासून ५ तासांच्या अंतरावर असलेल्या या भागात जवळपास ९४ हजार हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे.

दरम्यान, राजधानी कॅनबेरा इथला विमानतळ, वणवा तिथपर्यंत पोहोचण्याच्या शक्यतेमुळे बंद करण्यात आला आहे. पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये वाढलेली तापमानं आणि जोरदार वारे, यामुळे अनेक भागात नव्यानं आगीचे लोळ पसरत आहेत.

Exit mobile version