नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. त्यापैकी शंभर जणींची तपासणी करण्यात आली. या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे भारतीय परिचारिकांना वेगळं ठेवल्याची माहिती मिळाल्यावर मुरलीधरन यांनी जेद्दाह इथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि उपचारांची माहिती घेतली.
दरम्यान, यासंदर्भात दूतावासानं ट्विटर संदेशात दिलेल्या माहितीनुसार, तिला एम.ई.आर.एस.- सीओव्ही प्रकारच्या विषाणूची बाधा झाली असून, तो चीनमधल्या वुहान इथं पसरणारा कोरोनाचा प्रकार नाही.