Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आज १०वा राष्ट्रीय मतदार दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १०वा राष्ट्रीय मतदार दिवस आज देशभरात साजरा होत आहे. सशक्त लोकशाहीसाठी मतदार जागृती ही राष्ट्रीय मतदार दिवस २०२० साठीची यंदाची संकल्पना आहे.

२०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. २५ जानेवारी १९५० ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो.

राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या मानेकशॉ केंद्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. त्यानिमित्तानं विविध राज्यांमध्ये उत्तम निवडणूक प्रक्रीया राबवल्याबद्दल जिल्हा आणि राज्यपातळीवरील अधिकार्‍यांचं राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानही करण्यात येणार आहे.

Exit mobile version