Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा मार्ग मोकळा झाला आहे.

डाउनिंग स्ट्रिट इथं युरोपीय महासंघ आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर जॉन्सन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. ब्रिटनच्या नागरिकांच्या जनमताचा आदर ठेवून, येत्या ३१ जानेवारीपासून युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर आपण स्वाक्षरी केली असल्याचं, जॉन्सन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Exit mobile version