नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया सरकारनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हज यात्रा रद्द केल्यामुळे, भारतातून या यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सर्व यात्रेकरुंचे पैसे, हज कमिटी परत करणार आहे.

कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मकसूद अहमद खान, यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

पैसे परत मिळवण्यासाठी, कमिटीनं संकेतस्थळावर अर्जाचा एक नमुना प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नोंदणी केलेल्या हज यात्रेकरुंनी हा अर्ज भरुन पाठवावा असं आवाहन खान यांनी केलं असून, हा अर्ज भरल्यानंतर यात्रेकरुंच्या बॅंक खात्यात पैसे, थेट जमा होतील, असं स्पष्टं केलं आहे.