सुधारित फौजदारी प्रकिया कायदा आजपासून देशभरात लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : सुधारित फौजदारी प्रकिया (ओळख) कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. या कायद्यानुसार गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपीची शारिरीक मोजमापं, बोटांचे ठसे इत्यादी वैयक्तिक माहिती घेऊन ओळख पटवण्याच्या...
शिवसेनेच्या दोन गटातल्या वादासंदर्भातील पुढची सुनावणी येत्या सोमवारी
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुरू आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश आज न्यायालयानं निवडणूक आयोगाला...
पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या कोठडीत ४ दिवस वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने आज राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने...
माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट
उमेदवारांनी आरक्षणाबाबत १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन
मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे....
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची अजित पवार यांची राज्यपालांकडे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची मागणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पवार यांच्या नेतृत्वात...
मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६...
अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपूर दौऱ्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळं चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज चंद्रपूर दौऱ्यावर आहे. जिल्ह्यातल्या वरोरा, भद्रावती, राजुरा तालुक्यातल्या पूरग्रस्त भागाला या पथकानं...
शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजचा युक्तिवाद संपला पुढची सुनावणी उद्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही गटांचा मूळ पक्ष असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला आला आहे. सरन्यायाधीश एन व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या...
आयटीआय प्रवेशासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरिता 27 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे...











