पुणे : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना हि केंद्र सरकार मार्फत सन २००८ पासून संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. इतर कंपनींच्या तुलनेत सामान्य जनतेला अतिशय अल्प दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावेत या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. मागील वर्षांपासून केंद्र सरकार मार्फत ७ मार्च हा दिवस संबंध भारतात जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. जनऔषधी या इतर औषधांइतक्याच प्रभावी असून अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध आहेत.

यंदाही १ मार्च ते ७ मार्च जनऔषधींच्या जनजागृती साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ मार्च – मोफत आरोग्य तपासणी शिबीर, २ मार्च – डॉक्टरांसोबत जनऔषधी परिचर्चा, ३ मार्च – टीच देम यंग अंतर्गत फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थ्याना मार्गदर्शन, ४ मार्च – “जन जन तक” मोहिमेअंतर्गत गरजूंना मोफत औषधे वाटप, ५ मार्च – “जनऔषधी के साथ” नुसार ज्येष्ठ नागरिकांना जन औषधी बद्दल महत्व व जागरूकता अभियान, ६ मार्च – पदयात्रेचे आयोजन, ७ मार्च- प्रधान मंत्री नरेंद्र मोदी जनऔषधी योजनेच्या लाभार्थींबरोबर व्हिडीओ कॉन्फेरेंसिंगद्वारे संवाद साधणार.

महाराष्ट्रातील अधिकाधिक जनतेला या योजनेचा लाभ घेता यावा या अनुषंगाने हे जागरूकता अभियान राबवण्यात आल्याची माहिती भारतीय जनऔषधी परियोजनेचे महाराष्ट्र व गोवा विभागीय सहाय्यक व्यवस्थापक श्री. श्रीपाल समदारिया (मो.०८०५५१५०७०७) यांनी दिली.