नवी दिल्ली : 1 जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लष्करात एकूण 45,634 पदे रिक्त आहेत. यात सेकंड लेफ्टनंट पदाच्या वरची 7,399 पदे आहेत. लष्करातील भर्तीबाबत, भर्तीच्या अधिसूचनेसह प्रसिद्धीवर झालेला गेल्या तीन वर्षातला खर्च पुढीलप्रमाणे :
वित्त वर्ष रक्कम (लाख रुपयात)
1 2016-17 378.87
2 2017-18 199.47
3 2018-19 216.19
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.