नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऐतिहासिक दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी सुरू होत आहे, हे अतिशय भाग्यशाली असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.

आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं गुजरातमध्ये उद्धाटन करताना ते बोलत होते. साबरमती आश्रम ते दांडी अशा पदयात्रेला झेंडा दाखवून त्यांनी मार्गस्थ केलं. महात्मा गांधींनी देशाची वेदना ओळखली होती. स्वातंत्र्य चळवळ प्रत्येक भारतीयाची चळवळ होण्याचं श्रेय महात्मा गांधींनाच जातं, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी साबरमती आश्रमात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.