बारामती : विधानसभा निवडणूक 2019  करीता बारामती मतदार संघासाठी निवडणूक निरिक्षक म्‍हणून दिपकसिंह (आय.ए.एस) (भ्रमणध्‍वनी क्रमांक :- 9404543264) यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी बारामती येथील मतमोजणी केंद्र व स्ट्रॉगरूमची पाहणी करून तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे निवडणूक कामकाजाकरीता नियुक्‍त केलेल्‍या क्षेत्रिय अधिकारी तसेच संबंधित कर्मचा-यांची  आढावा बैठक घेतली .

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, योगेश कडूसकर, बालाजी ताटे, प्रमोद काळे, शिवप्रसाद गौरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निरिक्षक म्‍हणाले की, निवडणूक कामकाजासाठी नियुक्‍त असलेल्‍या अधिकारी व कर्मचारी यांनी  निवडणूकीचे कामकाज सुरळीतपणे  व जबाबदारीने, निवडणूक आयोगाने दिलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार पार पाडावे. कामकाज करताना काही अडचण आल्‍यास तत्‍काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी त्‍यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्‍या समस्‍या जाणून घेवून त्‍यांच्‍या समस्‍यांचे निरसन करून सविस्‍तर मार्गदर्शन  केले.