नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन करणार आहेत. शिक्षण मंत्रालय, विद्यापिठ अनुदान आयोग आणि बनारस हिंदु विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून ते ती दिवस चालणार आहे.
या संमेलनात सार्वजनिक आणि खाजगी विद्यापिठाचे ३०० हून अधिक कुलगुरु आणि संचालक सहभागी होणार आहेत. या बरोबरच शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते यांच्याबरोबर उद्योजक सहभागी होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या २०२० च्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबतीत या वेळी चर्चा होणार आहे.
या संमेलनाच्या उद्घाटनाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबाई पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित राहाणार आहेत. या संमेलनाच्या निमित्तानं देशातल्या आघाडीच्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना आपल्या धोरणात्मक यशाच्या कथा, त्याचप्रमाणे २०२० चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवतांना आलेले अनुभव सांगता येणार आहेत.