नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात देशातल्या वस्तू आणि सेवा कराच्या महसुलात २८ टक्क्यांची वाढ झाली. गेल्यावर्षी जीएसटीतून १ लाख १२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. आता ही रक्कम १ लाख ४३ हजार हजार कोटी रुपये झाली आहे. सलग सहाव्या महिन्यात ही रक्कम १ लाख ४० हजार कोटींपेक्षा अधिक आहेत.
गेल्यावर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये आयात केलेल्या वस्तूंमधून ५७ टक्के अधिक आणि सेवा आयातीमधून १९ टक्के अधिक महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. ऑगस्टमध्ये राज्यातून १८ हजार ८६३ कोटी रुपये जीएसटी गोळा झाला. इतर राज्यांच्या तुलनेत हा सर्वाधिक महसूल आहे. गेल्यावर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत ही वाढ २४ टक्के आहे.